
आधार कार्ड ( Aadhar card) हे एक महत्त्वाचे कागदपत्र समजले जाते. आपली सर्व वैयक्तिक माहिती आधार कार्ड वर असते. दरम्यान नोएडा येथे आधार कार्ड संबंधित व्यवसायाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी एक टोळी बनावट आधार कार्ड (Fake aadhar card racket) बनवत असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
नोएडा येथे सात जणांची टोळी बनावट आधार कार्ड बनवून देत होती. हे आधार कार्ड बनवून घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून १५ ते २० हजार रुपये आकारले जात होते. UIDAI प्रणाली सोबत छेडछाड करून ही टोळी बनावट आधारकार्ड बनवत होती. धक्कादायक बाब म्हणजे बनावट आधार क्रमांक बनवण्यासाठी पायाचे ठसे वापरले जात होते.
Breaking । शंभूराज देसाईंची मोठी घोषणा; जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरू
या टोळीने बनावट आधारकार्ड तयार करण्यासाठी ग्राहकांकडून बायोमेट्रिक्स गोळा केले. तसेच रेटिना स्कॅनमध्ये देखील फेरफार केली जाणार आहे. याद्वारे नवीन आधार क्रमांक तयार करण्यासाठी टोळीने नवीन डेटा UIDAI डेटाबेसमध्ये अपलोड केला आहे.
बनावट आधारकार्ड बनवणारी ही टोळी मागच्या दोन वर्षांपासून सक्रिय आहे. विशेष बाब म्हणजे टोळीने बनवलेल्या आधार कार्डांवर नाव आणि पत्ता यांसारखे तपशील सुद्धा आहेत. या लोकांच्या कार्यपद्धती वरून हे लक्षात येत आहे की, त्यांच्याकडे UIDAI डेटाबेसचा ऍक्सेस होता. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
Murder case | विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी प्रेयसीचा खून; गुगल सर्चमुळे गुन्हेगार अडचणीत!