Virat Kohali । विराट कोहलीची त्याच्या जवळच्याच मित्राने केली पोलखोल; म्हणाला…

Virat Kohli. Virat Kohli was trolled by his close friend; said..

यंदाचा आयपीएल ( IPL) सिझन विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादामुळे चांगलाच गाजला आहे. विराट कोहली हा एक आक्रमक खेळाडू आहे. तो अतिशय आक्रमक होऊन खेळतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आतापर्यंत त्याने अगदी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. दरम्यान विराट लहान असताना कसा खेळायचा याबाबत त्याच्या प्रशिक्षकांनी मोठा खुलासा केला आहे.

शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यांनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले….

विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी नुकताच विराटचा एक किस्सा सांगितला आहे. लहानपणी क्रिकेट अकादमीत असताना विराट कधीच त्याच्या वयाच्या मुलांकडून आऊट होत नव्हता. एक दिवशी त्याने अकादमीमधील मोठ्या मुलांसोबत खेळण्याचा हट्ट धरला. त्यावेळी रागाच्या भरात प्रशिक्षकांनी त्याला संधी दिली. यावेळी विराटने ( Virat Kohali) चांगली बॅटिंग केली.

पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार; ऐकून अंगावर काटा येईल…

मात्र खेळत असतानाच अचानक एक चेंडू विराटच्या छातीवर लागला. परंतु, विराट कोहलीने याबाबत कोणालाच सांगितले नाही. जेव्हा घरी आईने विराटला लागलेले पाहिले तेव्हा विराटच्या आईने प्रशिक्षकांना फोन करून सांगितले की, विराटची त्याच्या वयाच्या मुलांसोबतच प्रॅक्टिस घ्या. त्याला मोठ्या मुलांसोबत खेळू देऊ नका.

Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहली हा मूळचा दिल्लीचा आहे. मात्र मागील कित्येक वर्षे तो आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ( RCB) खेळत आहे. परंतु, लवकरच विराट कोहलीचा संघ दिल्लीच्या संघाशी भिडणार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलचे जेतेपद मिळवणार का ? हे पाहणे रोमांचकारी असणार आहे.

मोठी बातमी! यूट्यूबला कंटेंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *