पक्षबांधणीसाठी स्वतः रश्मी ठाकरे मैदानात उतरणार! लवकरच सुरू करणार राजकीय दौरे

Rashmi Thackeray himself will enter the field for party building! Will start political tours soon

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेवर मोठे संकट कोसळले होते. यामध्ये एक पक्ष दोन गटात विभागाला गेला. दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. दोन्ही बापलेकांचे राज्यात तहान भूक विसरून दौरे सुरू आहेत. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील पक्षबांधणीसाठी मैदानात उतरणार आहेत.

अजित पवार भाजपमध्ये जाणार? शरद पवार म्हणाले, “मला काहीही…”

एप्रिल (April) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे त्यांच्या राजकीय दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत. नाशिकमध्ये पक्षाची डागडुजी करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा ( Nashik) दौरा करणार आहेत. एवढेच नाही तर नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊन रश्मी ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत.

कारखान्यावर छापा पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

याआधी रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray) राजकीय कार्यक्रमांना फक्त हजेरीच लावत होत्या. तसेच कोणत्याही राजकीय विषयावर त्या टिपण्णी देत नव्हत्या. आता मात्र रश्मी ठाकरे स्वतःहून राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेव ठाकरे) पक्षाच्या अस्तित्त्वाच्या लढाईत आता रश्मी ठाकरे यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे. नाशिक दौरा हा रश्मी ठाकरेंचा पहिला वहिला राजकीय दौरा असणार आहे.

ब्रेकिंग! गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *