
नुकताच उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. अशातच तापमान देखील चांगलेच वाढत आहे. या दिवसांत बहुतेक लोकांना उष्णता वाढल्याने उष्माघाताचा ( Heat Stroak) त्रास होतो. उष्माघात इतका धोकादायक असतो की, मृत्यु देखील होण्याची शक्यता असते. दरम्यान उष्माघाताचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मंदिरात आरती सुरू होती अन् अचानक झाड कोसळलं; ७ भाविक जागीच ठार तर ३५ जण गंभीर जखमी
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
1) उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवावे.
2) उन्हात काम करताना कायम पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
3) तुम्ही फार उन्हात काम करत असाल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
4) ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
5) ओआरएस (Ors), लस्सी, ताक, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचे सेवन करावे. (Cold Drinks)
6) वेळोवेळी थंड पाण्याने अंघोळ करावी.
अयोध्येत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर तुफान फटकेबाजी; मोठी घोषणा करून दिला धक्का
या गोष्टी करू नका
1) लहान मुलांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात फार वेळ ठेऊ नये.
2) बारा ते तीन या कालावधीमध्ये फार उन्हात फिरू नका.
3) गडद व घट्ट कपडे घालू नयेत.
4) जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे करू नये.
5) घरात मोकळी हवा येऊ द्यावी.
6) शिळे अन्न खाऊ नये.
7) जास्त उष्णता असलेले पदार्थ व मांसाहार टाळावा.