
रॅपर एमसी स्टॅन ने ‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद जिंकल्यापासून तो सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्रासह देशभरात आता एमसी स्टॅन चर्चेचा विषय ठरला आहे. एमसी स्टॅनने त्याच्या चाहत्यांसाठी संपूर्ण देशभरात त्याचे कॉन्सर्ट आयोजित केले आहेत.
लवकरच हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार, अदानींना पुन्हा धक्का बसणार? चर्चांना उधाण
मागच्या काही दिवसापूर्वी स्टॅनचं इंदौरमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होत. मात्र या कॉन्सर्टदरम्यान बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हंगामा करत कार्यक्रम बंद पाडला होता. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा कॉन्सर्टसाठी त्याला कडाडून विरोध झाला. त्याची गाणी ऐकण्यासारखी नाहीत असं म्हणत त्याला विरोध झाला आहे. यामध्येच आता गर्दीत त्याला मारायला लोक आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
शेवटी नाद पूर्ण केलाच! स्कूटर घेण्यासाठी सहा वर्षांपासून साठवली 90 हजाराची चिल्लर; व्हिडीओ एकदा बघाच
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टॅन एका कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान अनेक चाहते एमसी स्टॅनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच त्याच्यावर हल्ला होतो. यादरम्यान स्टॅन कोणावर तरी ओरडताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एमसी स्टॅनचे चाहते या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.
धक्कदायक घटना! विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ