
वाळू विक्रीचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान राज्य सरकारने याबाबत एक नवीन धोरण आखले आहे. नुकत्याच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण आखले गेले असून यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी पुढाकार घेतला आहे.
“गौतमी करते ती लावणी नाही, तर…”; सुरेखा पुणेकर भडकल्या
या धोरणाअंतर्गत घरपोच वाळूविक्री केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी करून ज्याला गरज असेल त्याला घरपोच वाळू पुरवठा करण्यासाठी व चालू वाळू विक्रीवरील वाद मिटवण्यासाठी हे धोरण आखण्यात आले आहे. वाळू व्यवसायातील ( Sand Buisness) भयानक चित्र बदलण्यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पठाण चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित
मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल करणारा हा व्यवसाय आहे. अनेक ठिकाणी हा व्यवसाय अनधिकृतपणे केला जातो. या व्यवसायात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात कित्येक नेते व उद्योगपती देखील समावेश आहेत. या व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले.
अमृता फडणवीस यांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; जाणून घ्या त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?
यासाठी विविध नियम (Rules) बनवण्यात आले. कायदे तयार करण्यात आले. मात्र नियम तितक्याच पळवाटा ! यामुळे या व्यवसायातील भ्रष्टाचाराला व चोरीला आळा घालण्यासाठी विखे पाटील यांनी पुढाकार घेत हे नवीन धोरण आखले आहे.
झोपलेल्या व्यक्तीजवळ जाऊन बसले तीन चित्ते अन् पुढे घडल असं की, पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा Video