
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अशातच नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी आहेत. त्यांच्यावर किडनी संबंधित आजारावर उपचार सुरू आहेत.
हाताच्या कोपऱ्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्याचे जालीम उपाय; वाचा सविस्तर
प्रल्हाद मोदी ( Pralhad Modi) हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. मागील अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंडा संबंधित आजाराने त्रस्त होते. मात्र प्रकृती जास्तच गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान प्रल्हाद मोदी यांचे निवासस्थान अहमदाबाद मध्ये असून येथे त्यांच्या मालकीचे किराणामालाचे दुकान व टायरचे शोरूम आहे.
मोठी बातमी! राखी सावंत दुबईत सुरु करणार अक्टिंग अकॅडमी
प्रल्हाद मोदी हे 2018 मध्ये चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये आंदोलन केले होते. गुजरात फेअर प्राइज शॉप आणि केरोसिन लायसेंस होल्डर्स यांच्यामध्ये मोठा वाद सुरू होता. आणि त्यावेळी ते गुजरात प्राइज शॉपचे अध्यक्ष होते. दरम्यान गुजरात फेअर प्राइज शॉप आणि केरोसिन लायसेंस होल्डर्स यांच्यामधील वाद निवळण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते निवळले नाहीतच.