
सध्या बॉलिवूडमधील सिद्धार्थ आणि कियारा (Siddharth-Kiara) हे जोडपं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नुकताच या दोघांचा विवाह सोहळा काल (दि.७) राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagarh Palace in Rajasthan) थाटामाटात पार पडला आहे. हा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडलाआहे.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत!
यामध्ये नवरदेवाकडील पाहुण्यांनी व्हाईट कपडे परिधान केली होती तर नवरीकडील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते. थोडक्यात म्हणजे त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम ‘पिंक अँड व्हाईट’ (‘Pink and White’) अशी होती.
या विवाह सोहळ्याला मीरा कपूर, शाहिद कपूर, जूही चावला, करण जोहर, मनीष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी संध्याकाळी 5 वाजता एकमेकांना हार घातले आणि 6 वाजता त्यांनी सात फेरे घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मतपेरणी; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!