Ajit Pawar On Sudhir Mungantiwar : महागाई, इंधनदरवाढ, जीएसटी वाढीवर का बोलत नाही? अजितदादांचा मुनगंटीवारांना खोचक सवाल

Why not talk about inflation, fuel price hike, GST hike? Ajitdad's question to Mungantiwar

मुंबई : रखडलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप दोन दिवसांपूर्वी झाली. यावेळी सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात आली. जबाबदारी येताच सुधीर मुनगंटीवारांनी मोठी घोषणा केली. हॅलो हा विदेशी शब्दाऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरू करण्याचा आदेश मुनगंटीवारांनी दिला आहे. आता यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) सुधीर मुनगंटीवारांना (Sudhir Mungantiwar) खोचक सवाल केलाय.

अजित पवार म्हणाले की, महत्वाच्या विषयांवर चर्चा केली पाहिजे .आपण जय महाराष्ट्र म्हणतो, जय हिंद बोलतो, जय हरी बोलतो. आता वंदे मातरम् मध्येच काय काढलंय? माझा त्याला विरोध नाही. पण तुम्ही महागाई, इंधन दरवाढ, जीएसटी वाढीवर बोलत नाही, या शब्दांमध्ये अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावलाय.

रझा अकादमिंनी देखील विरोध केलाय –

“आमच्यामध्ये फक्त आणि फक्त अल्लाहची पूजा होते. त्यामुळे वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा .जो सर्वांना मान्य असेल. याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करुन राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे रझा नूरी म्हणाले”.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *