पुणेरी रिलस्टार अथर्व सुदामे अडकला लग्नबंधनात; सेलेब्रिटींनीही दिल्या शुभेच्छा!

Puneri Reelstar Atharva Sudame stuck in marriage; Celebrities also wished!

आजकाल लोकांना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. अथर्व सुदामे हे यातीलच एक नाव आहे. सामाजिक व विनोदी विषय घेऊन लोकांचे मनोरंजन करणाऱ्या अथर्वचे भरपूर चाहते आहेत. या अस्सल पुणेकर रिलस्टारचे ( ReelStar) नुकतेच लग्न झाले आहे.

दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; आज होणार सुनावणी

सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॅन फॉलोविंग असणाऱ्या अथर्वचे प्रजासत्ताक दिनी (ता.26) लग्न झाले आहे. त्याची अगदी जवळची मैत्रीण रुचा जोशी हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अथर्वने मिसेस सुदामे असे कॅप्शन दिले आहे.

लोकशाहीवर भाषण देणारा चिमुरडा देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज

या फोटोंमध्ये हे दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. तसेच सप्तपदी घेतानाचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. इतकंच नाही तर यातल्या एका फोटोत ही नवविवाहित जोडी एकमेकांना मिठी मारताना देखील दिसत आहे.

धक्कादायक! पुण्यात कोयता गॅंगने शाळकरी मुलावर केला कोयत्याने हल्ला

अथर्व सुदामेच्या (Atharv Sudame) लग्नाची माहिती मिळताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक सेलेब्रिटींनी देखील अथर्व व रुचा ला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सुयश टिळक, पुष्कर जोग, मेघना एरंडे यांचा समावेश आहे.

मोठी बातमी! पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *