
‘सैराट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली आर्ची फेम रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे विविध लुक्स मधील फोटो व व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. इतकंच नाही तर तिच्या लुक्स मुळे ती चर्चेत देखील असते.
सैराट चित्रपटाची आर्चीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आर्चीचे चाहते नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. दरम्यान अर्चिला म्हणजेच रिंकू राजगुरूला बाॅयफ्रेंड आहे का, असा प्रश्नही चाहत्यांना नेहमीच पडतो.
मात्र काही दिवसांपूर्वी तिने युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती त्यावेळी ती म्हणाली होती की, अजूनतरी माझ्या आयुष्यामध्ये कोणीही मुलगा नाही. ज्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये कोणी मुलगा येईल, त्या दिवशी मी स्वतः याबाबत सांगेन. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. असं रिंकू राजगुरू यावेळी म्हणाली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ होणार बंद? खुद्द दिग्दर्शकानेच मालिका सोडून सुरू केला नवीन कार्यक्रम