“वादळ येत आहे…”, रितेश देशमुखचे पठाण चित्रपटाबाबत केलेले ट्विट चर्चेत

"Storm is coming...", Riteish Deshmukh's tweet about Pathan movie is in discussion

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित पठाण (Pathan) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते तो अखेर आज रिलीज झाला आहे. देशातील अनेक थिएटर्स हाऊसफुल्ल देखील झालेत. मुंबईसह पुण्यातील थिएटर्सच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मागच्या काही दिवसापासून हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणताही धुडगूस घालू नये, थिएटर्सच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

एक पाय निकामी असून देखील सहावीत शिकणाऱ्या चिमुकल्याने सर केला रायगड किल्ला!

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटासाठी अभिनेता रितेश देशमुखने देखील ट्वीट केलं आहे. ट्विट करत तो म्हणाला की, “वादळ येतंय. तुमचा सीटबेल्ट घट्ट बांधा. खूप दिवसांची प्रतीक्षा करायला लावली. शाहरुख तुला शुभेच्छा. पठाण चित्रपटाचं तिकीट मी आधीच बूक केलं आहे”.

दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नाहीतर हत्याच!

दरम्यान, हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच ४.१९ लाखांपेक्षा जास्त अँडवान्स बुकींग देखील झालेलं आहे. हा सिनेमा जवळपास ४० ते ५० कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी सिनेअभ्यासकांकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झाला आहे.

शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपट अखेर आज रिलीज!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *