
‘नैसर्गिक शेती’ (natural farming) राज्यस्तरीय परिषद 2022 चे पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तसेच गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी फडणवीस बोलताना म्हणाले की, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. दरम्यान पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे.
सुवर्णसंधी! ‘या’ शेतकऱ्यांना जिंकता येणार 5 लाखांचे बक्षीस, असा करा अर्ज
केंद्र स्तरावर मिशन सुरू
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीसाठी 2015-16 मध्ये केंद्र स्तरावर मिशन सुरू केले. दरम्यान 2016-17 मध्ये 5 लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी आणि फलोत्पादन विभागानं आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार झाले. या मिशनचा कालावधी जरी संपत असला तरी त्यास नव्याने मुदतवाढ देण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना एकत्र करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला,असेही फडणवीस म्हणाले.
Rakhi Sawant: “मला मुख्यमंत्री बनवा”, राखी सावंतने केली अजब-गजब मागणी, व्हिडिओ व्हायरल
गावं जलस्वयंपूर्ण करणार
नैसर्गिक शेतीला चालना मिळावी यासाठी राज्यात मागील काळात जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून रब्बीचे पीक वाढवण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळं 39 लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली. तसेच 27 टीएमसी पाणी थांबवल्याने याचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. दरम्यान पुढच्या टप्प्यात गावं जलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा यासाठी ही योजना राबवायची असल्याचे फडणवीस म्हणाले.
बापरे! चक्क म्हशींनी फोडलं वंदे भारत एक्सप्रेसचं नाक, 147 कलमानुसार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
स्मार्ट प्रकल्पाला गती देणार
मागील काळात विविध गावांमध्ये केंद्रीत पद्धतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली. या योजनेसाठी जागतिक बँकेने साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी दिला. तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘स्मार्ट’ सुरू करण्यात आला. हा ‘स्मार्ट’ प्रकल्प महाराष्ट्रातल्या 10 हजार गावांमध्ये सुरु करण्यात आला. इतकंच नाही तर या प्रकल्पावर 2 हजार 100 कोटी खर्च करण्यात आला. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून बाजारपेठेची विविध श्रृंखला तयार करणे, साठवणूक व्यवस्था, मार्गदर्शन, बाजाराशी लिंकेज याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पालाही गती देण्यात येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील राम मंदिराबाबत दिली महत्वाची माहिती
शेतमालाचा भाव वाढताना उत्पादन खर्चही वाढला
पुढे फडणवीस म्हणाले की, नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. दरम्यान 1905 मध्ये इंग्रज सरकारने अल्बर्ट हॉवर्ड यांना कृषी सल्लागार म्हणून पाठवले. हॉवर्ड यांनी पारंपरिक शेती विज्ञानाधारीत असून त्यात चक्रीय अर्थव्यवस्था आहे असल्याचे फडणवीस म्हणाले. आपण नंतरच्या काळात अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलेल्या रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले, पण चक्रीय अर्थव्यवस्था मंदावली. त्यामुळं शेती फायद्याची होत नसल्याचे फडणवीस म्हणाले.
धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं? फैसला पडला लांबणीवर
देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करावी – आचार्य देवव्रत
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी बोलताना म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही. तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. म्हणून देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करुन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.