ITBP Recruitment । दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळणार 69 हजार पगार

10th pass candidates will get a golden job opportunity, monthly salary of 69 thousand

ITBP Recruitment । देशभरातील अनेक विद्यार्थी नोकरी न करता किंवा नोकरी सोडून स्पर्धा परीक्षांचा (Competitive Examinations) अभ्यास करत आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना त्यात यश मिळते तर काहींना अपयश सहन करावे लागते. जर तुम्हीही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्यासाठी एक नोकरीची (Job) संधी चालून आली आहे. (Latest Marathi News)

Milk Price | राज्य सरकारची दूध दरवाढ खोटी! दरवाढ करूनही मिळतोय ‘इतकाच’ दर

दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भारत तिबेट सीमा पोलीस दलामध्ये (Indo-Tibetan Border Police Force) नोकरी संधी मिळणार आहे. आयटीबीपीमध्ये (ITBP) 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी भरती निघाली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. भरती होणाऱ्या उमेदवाराला महिन्याला 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल. जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची अंतिम मुदत 26 जुलै 2023 आहे.

Bus Accident । धक्कादायक! बस तलावात पडून 17 जणांचा मृत्यू, तर 35 जखमी

तुम्ही आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाईटला itbpolice.nic.in भेट देऊन अर्ज करू शकता. त्यासाठी तुमचे वय कमीत कमी 21 वर्षं आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असावे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून एसएससी, म्हणजेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही भरती ड्रायव्हर पदासाठी असून उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स महत्त्वाचे आहे.

Indonesia News । मोठी बातमी! २१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात जिम ट्रेनरचा गेला जीव

Spread the love