
आपल्या बँक खात्यात भरपूर पैसे असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर आपल्या खात्यात कोटींमध्ये अचानक रक्कम जमा झाली तर? आपण आनंदाने बहरून जाऊ. असाच आनंदाचा क्षण एका कामगाराच्या जीवनात देखील आला आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal ) मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेवपूर येथील रहिवासी असणारे मोहम्मद नसिरुल्लाह मंडल म्हणाले की, “पोलिसांचा अचानक फोन आला आणि माझी झोपच उडाली…. मी नेमकं काय केलं आहे, हे मला समजत नव्हतं . अचानकच माझ्या खात्यामध्ये १०० कोटी रुपये जमा झाले, आणि खरं सांगायचं तर माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. मी बऱ्याच वेळा माझं खातं चेक केलं. पण प्रत्येक वेळी त्यामध्ये १०० कोटीचं दिसलं, त्यामुळेच मला आश्चर्याचा धक्काच बसला.
शेतातील काम करताना ट्रॅक्टरखाली सापडून बारामतीतील युवा शेतकऱ्याचा मृत्यू
त्यामुळे मी थेट पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) धाव घेतली. या झालेल्या व्यवहाराची चौकशी केली”. असं मंडल यांचं म्हणणं आहे. ‘कमावलं तरच खायचं’ यावर अवलंबून असणारी व्यक्ती आणि दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा समजतं की, त्याच्या खात्यात एवढे पैसे जमा झालेत. त्यावेळी त्याला झालेल्या द्विगुणित आनंदाचा आपण विचार करू शकतो. पश्चिम बंगालमधील हातावर पोट असणारे, काम केले तरच खायचं, अशा मोहम्मद नसिरुल्लाह मंडल यांच्या आयुष्यात हा सुखकर अनुभव आला आहे. नशिबाने त्यांना वेगळंच स्वप्न दाखवलं.
जेठालाल होण्याआधी दिलीप जोशी करत होते ‘हे’ काम, वाचून व्हाल थक्क
इंडिया टुडेतील (India Today) एका बातमीनुसार, मंडल यांच्या खात्यामध्ये फक्त १७ रुपये जमा व्हायचे. पण दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे त्यांनी कधी त्यांचे खातेदेखील तपासले नव्हते. अचानक एके दिवशी सकाळच्या वेळी सायबर सेलचे (cyber sel) काही अधिकारी त्यांच्या घरी नोटीस घेऊन आले. तर त्यांच्या खात्यात एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल १०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्या अधिकाऱ्यांनी मंडल यांना दिली. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी मंडल यांना नोटीस पाठवून ३० मे रोजी बोलावलं आहे. तिथे त्यांच्या खात्यात अचानक पैसे आले, त्याबद्दल त्यांची चौकशी केली जाणार आहे.
सर्वात मोठी बातमी! भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, खुद्द शिंदे गटाच्या खासदाराने केले गंभीर आरोप